Bhalgaon भालगाव येथे परीवर्तन प्रतिष्ठान तर्फे हळदीकुंकू कार्यक्रमाचेआयोजन
वार्ताहर /संपादक
अशोक आव्हाड
भालगाव येथे परीवर्तन प्रतिष्ठान तर्फे हळदी कुंकू कार्यक्रमाचेआयोजन
भालगाव येथे परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी परिवर्तन प्रतिष्ठानच्या अध्यक्ष डॉ मनोरमाताई खेडकर उपाध्यक्ष वैशाली ताई. पार्वती खेडकर, जयश्री बेद्रे सर्व नुतन महीला ग्रा. प. सदस्य आदि महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या हळदी कुंकवाचा कार्यक्रमासाठी भालगाव व भालगाव परिसरातील असंख्य महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये महिलांनी एकमेकीला हळद कुंकू लावून वान देऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतला वर्षातील मकर संक्रांत हा महिलांसाठी एकमेव असा सण असतो तो म्हणजे मकर संक्रांती या सणांमध्ये महिला एकमेकीला हळदीकुंकू लावून वाण म्हणून साडी चोळी व इतर प्रकारचे वाण एकमेकीला भेट देण्यात येतात व या सणामुळे संपूर्ण महिला एकत्रित येऊन आनंद व्यक्त करतात
अशाच हळदी कुंकवाचे कार्यक्रम भालगाव इतरत्र किर्तनवाडी, मिड सांगवी, दैत्य नांदूर, येळी या ठिकाणी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी या कार्यक्रमासाठी गावातील सर्व महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे