Bhagvan nagar भगवान नगर वस्ती च्या भगवानभक्तांकडून श्री क्षेत्र भगवानगडाला १६ लक्ष रूपये देणगी
वार्ताहर /संपादक
अशोक आव्हाड
भगवान नगर वस्ती च्या भगवानभक्तांकडून श्री क्षेत्र भगवानगडाला १६ लक्ष रूपये देणगी
अंबड तालुक्यातील भगवान नगर वस्ती (डोनगाव दर्गा )ता.अंबड येथील अवघ्या 30 घराची वस्ती असलेल्या खानदानी भगवान भक्तांनी श्री क्षेत्र भगवान गड येथे निर्माण होत असलेले संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर निधी करिता 16 लक्ष एवढी विक्रमी देणगी आज श्री क्षेत्र भगवान गडाचे मठाधीपती न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीजी यांच्या उपस्थितीत जाहिर केली. पुढील वर्षी डोणगाव ग्रामस्थांनी वर्गणी देण्यासाठी महंतांना आमंत्रण दिले आहे. भगवानगडावर होत असलेल्या माऊलींच्या भव्यदिव्य मंदिर निर्माणासाठी भगवानबाबांचे आणि भगवानगडाचे खानदानी भक्त पुढे सरसावले आहेत. गांवोगांवचे लोक महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांना संपर्क करून आपल्या गांवात वर्गणीसाठी आमंत्रण देत आहेत. भगवानगडाला दिलेला पैसा हा सत्कर्मणी लागत असल्यामुळे चांगल्या कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा या भावनेतून भाविक भक्तांमध्ये देणगी आणि वर्गणी देण्यासाठी उत्साह दिसून येत आहे. महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी भाविकांना आशीर्वाद देऊन त्यांचे आभार व्यक्त केले.