खरवंडी कासार येथे आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते विविध कामाचे भूमिपूजन संपन्न.
खरवंडी कासार येथे आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते विविध कामाचे भूमिपूजन संपन्न.
वार्ताहर /संपादक अशोक आव्हाड
खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन शेवगाव पाथर्डी च्या शेवगाव पाथर्डीचे आमदार मोनिकाताई राजळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी पावन गणपती ते बाजार तळ 45 लक्ष, मारुती मंदिर ब्लॉक 10 लक्ष , जुना नांदूर रस्ता ते चिंतामणी मंदिर 40 लक्ष , एम एस 222 लोहा ते काटेवाडी ग्राम सडक योजने मधून 1कोटी 50 लाख रुपये, राज्यस्तरीय दलित वस्ती विकास निधी अंतर्गत स्मशानभूमी दुरुस्ती 10 लक्ष रुपये, कंकया नगर येथे रस्ता कॉंक्रिटीकरण 10 लक्ष रुपये एवढा निधी विविध प्रकारची कामे करण्यासाठी या ठिकाणी देण्यात आली व या कामाचे भूमिपूजनही झाले
यावेळी या भूमिपूजन समारंभासाठी आमदार मोनिकाताई राजळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माणिक मामा खेडकर, भाजपा तालुका अध्यक्ष मृत्युंजय गरजे, भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय कीर्तने, वामनराव कीर्तने, सरपंच प्रदीप पाटील ,वृद्धेश्वर कारखान्याचे संचालक बाळासाहेब गोल्हार, महिला आघाडीच्या काशीताई गोल्हार,भाजपा युवा मोर्चा महेश बोरुडे, अशोक खरमाटे, डॉ. अरविंद हुदेदार, भाऊसाहेब सांगळे, योगेश अंदुरे, युसुफबाई बागवान, माणिक बटुळे, हरी पंडित महाराज, रमेश शिवगजे, सुरेश कोळपकर, धोंडीराम केळगंद्रे, प्रेम शेठ लोंदे, सामाजिक कार्यकर्ते दादा जाधव, माऊली सानप, बाप्पा ढोले, वसंत पवार, आसाराम आंदुरे आदी मान्यवर व नागरिक यावेळी उपस्थित होते
भूमिपूजनानंतर उर्वरित कार्यक्रम श्री संत जनार्दन स्वामी महाराज मंदिरात आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पाटील यांनी केले व आभार बाबासाहेब अंदुरे यांनी मानले
येणारे भावी काळामध्ये देखील खरवंडी परिसरामध्ये अशीच विविध प्रकारची कामे केली जातील असे आश्वासन यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिले