श्री लक्ष्मी नृसिंह प्रतिष्ठान आणि पाथर्डी तालुका समरसता मंडळ आयोजित आरोग्य तपासणी तथा हिमोग्लोबिन तपासणी शिबिर
वार्ताहर /संपादक अशोक आव्हाड
श्री लक्ष्मी नृसिंह प्रतिष्ठान आणि पाथर्डी तालुका समरसता मंडळ आयोजित आरोग्य तपासणी तथा हिमोग्लोबिन तपासणी शिबिर
पाथर्डी: पाथर्डी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने पाथर्डी येथील श्री लक्ष्मी माता मंदिर परिसर सेवा वस्ती या विभागात प्रथमतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन त्याच प्रमाणे लक्ष्मी मातेची आरती मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.. त्यानंतर आरती संपन्न झाली व आरोग्य तपासणी शिबिराला प्रारंभ झाला ..सदर शिबिराचा लाभ परिसरातील अनेक गरजू रूग्णांनी घेतला.. यामध्ये हिमोग्लोबिन तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी आणि आवश्यक त्या औषधांचे वाटप रूग्णांना करण्यात आले..यावेळी प्रशांत हंपे,सनी दिनकर,सतीश दिनकर,गोरख दिनकर,जगदीश लोहीया,दत्ता वाघ आदी श्री.लक्ष्मीनृसिंह प्रतिष्ठान व पाथर्डी तालुका समरसता मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते…डॉ.ज्योती देशमुख,डॉ.जगदीश मुने,डॉ.सुहास उरणकर,डॉ.श्रीधर देशमुख या डॉक्टरांनी रूग्णतपासणी केली..श्री.लक्ष्मीनृसिंह प्रतिष्ठानच्या वतीने सुमारे ४० रूग्णांची रक्त तपासणी व औषधांचे वाटप विनामूल्य करण्यात आले..समरसता मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते…