जिरेवाडी शाळेचे पहिले वार्षिक संमेलन उत्साहात संपन्न
कोरडगाव प्रतिनिधी
विठ्ठल आंधळे
जिरेवाडी शाळेचे पहिले वार्षिक संमेलन उत्साहात संपन्न
कोरडगाव :पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव केंद्रातील जिल्हा परिषदेच्या जिरेवाडी शाळेचे पहिले वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदात यशस्वी पार पडले.पहिली ते चौथी च्या मुलांनी सादर केलेल्या कलागुणांनीं उपस्थितांची भरपूर वाहवा मिळवली. व सर्वांना आपल्या कलेने आश्चर्य चकित केले.या कार्यक्रमास गटाचे जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे , पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर जगदीश पालवे तसेच भाजपा तालुका अध्यक्ष गोकुळभाऊ दौंड हेही उपस्थित होते..अशा कार्यक्रमातून मुलांच्या कलागुणांना व सुप्तगुनाना वावं मिळतो असे राहुल राजळे यांनी सांगितले तर मुलांच्या कलागुणांचा कौतकासह तालुक्यात राबवित असलेले उपक्रम” डिजिटल लॉकडाऊन आणि सामान्य ज्ञान स्पर्धा ” यला विषयी जनजागृती केली.
तसेच गोकुळ दौंड यांनी मुलांनी अविश्वशनिय कला सादर केली . जिरेवाडी शाळा नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांसाठी ओळखली जाते . त्याबद्दल शिक्षकाचे कौतुक केले.
यावेळी संपूर्ण जीरेवाडी गाव कर्यक्रमासाठी उपस्थित होते. शाळेच्या इतीहासात पहिल्यांदाच असा कार्यक्रम होत असल्याने सगळीकडे संपूर्ण उत्साहाचे , आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मुलांनीही नेत्रदीपक कला सादर करीत सर्वाच उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना दराडे सहशिक्षक वसंत दहिफळे , दुसरे सहशिक्षक अण्णासाहेब साळुंके यांनी विशेष श्रम घेतले .शाळा व्यवस्थापन समिती जिरेवाडी तसेच ग्रामपंचायत जिरेवाडी समस्त गावकरी तरूण वर्ग या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी कण्यासाठी जीव ओतून सहकार्य केले.