प. महाराष्ट्र

शेवगांव तालुक्यातील ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत करणे व बँक,पतसंस्था चोरी टाळण्यासाठी “मोशन सेंसर सायरन” बसविणे अत्यंत आवश्यक :- पो. निरीक्षक- विलास पुजारी

शेवगाव प्रतिनिधी
संतोष चिंतामणी

शेवगांव तालुक्यातील ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत करणे व बँक,पतसंस्था चोरी टाळण्यासाठी “मोशन सेंसर सायरन” बसविणे अत्यंत आवश्यक :- पो. निरीक्षक- विलास पुजारी

शेवगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत करणे व बँक,पतसंस्था व घरात राहणाऱ्या व्यक्तीने चोरी टाळण्यासाठी मोशन सेंसर सायरन बसविणे अत्यंत आवश्यक पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी व्यक्त केले
मा.श्री.विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.श्री.बी.जी.शेखर साहेब, मा. पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला साहेब,मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे साहेब,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संदीप मिटके साहेब यांचे आदेशान्वय़े शेवगाव तालुक्यातील सर्व बँक व पतसंस्थेचे पदाधिकारी यांची मीटिंग घेऊन शेवगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपचायतीने आपले हद्दीत ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत करुन तसेच बँक व पतसंस्था चोरी व घरफोडी यासारख्ये गुन्हे यापुढे घडु नये व अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मीटिंग घेऊन जनतेला सतर्क करावे अशा सुचना दिलेवरुन दि.06/2/2023 रोजी 4/30 वा.ते 6/00 वाजेच्या दरम्यान शेवगाव पोलीस स्टेशनला मीटिंग घेऊन बँकेतील असुविधाबाबत सर्व बँक व पतसंस्था अधिकारी यांना जाणीव करून दिली.त्यामध्ये शेवगाव तालुक्यातील उपस्थित बॅक व पतसस्थेचे अधिकारी यांना विचारपुस करुन खात्री केली असता ब-याच बॅकामध्ये सुरक्षारक्षक व सेन्सार सायरन नसल्याचे आढळुन आले असुन त्यांना तात्काळ सुरक्षारक्षक नेमण्याविषयी व सेन्सार सायरन बसविण्याविषयी आवाहन केले आहे.तसेच शेवगाव मधील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घराच्या वैयक्तीक सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकाऐवजी मोशन सेन्सार सायरन आपल्या घरात बसून घेतल्यास घरफोडी,चोरीसारखे गुन्ह्यांना आळा बसेल व सुरक्षा रक्षकापेक्षाही चांगल्या पध्द़तीने आपल्या घराचे रक्षण होवु शकेल त्याकरीता सेन्सार सायरण बसविण्याविषयी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज क्लियर येथील अशा उच्च प्रतीचे बसविणे आवश्यक आहे त्यापैकी एक कॅमेरा बँकेचा रोड समोर बसवल्यास रोडवरून जाणारे येणारे गुन्हेगारांना ओळखण्यासाठी व त्यांचा शोध घेण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो.अशा प्रकारचे सेन्सॉर सायरन उपकरण माजी नगरसेवक सागर फडके यांनी आपले वार्डातील जनतेला मार्गदर्शन केलेवरुन त्यांचे वार्डातील ब-याच व्य़क्तीनी घरात सेन्सॉर सायरन उपकरण बसवुन घेतल्याने घरफोडी सारख्या गुन्ह्याना प्रतिबंध झाला आहे.अशा प्रकारे शेवगाव शहरातील प्रत्येक नगरसेवकानी तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे संरपच यांनी आपल्या गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत करावी व खेड्यातील प्रत्येक घरामध्ये सेन्सार सायरण बसवण्यासाठी नागरीकांना मार्गदर्शन करावे.त्यामुळे घरफोडी,चोरी सारख्या गुन्ह्याना आळा बसुन प्रतिबंध होईल.
यावर मिटींग मधील उपस्थित पदाधिकारी श्री. भाऊसाहेब पाचरणे यांनी मार्गदर्शन करताना सांगीतले की, साईधन अर्बन मल्टीस्टेट निधी शेवगाव पतसस्थेत मोशन सेन्सार सायरन उपकरणामुळे दि.4/02/2023 रोजी 3/30 वा. रात्रीचे सुमारास चोरट्यांनी पतसंस्थेतील इलेक्ट्रिक मीटरचे वायर कट करून वीज सप्लाय बंद केला होता शॉर्ट सर्किट करून इन्व्हर्टर सप्लाय देखील बंद करण्यात आला होता त्यामुळे पतसंस्थेतील सर्व विज पुरवठा खंडीत होवुन सी.सी.टी.व्ही कॅमेरे बंद झाले होते.त्यानंतर पतसंस्थेचे शटर चोरट्याने गॅस कटरने कट करून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.परंतु सदर पतसस्थेत आवाज कंपनीचे मोशन सेन्सॉर सायरन हे उपकरण बसवलेले असल्याने सेन्सॉर सायरनचा मोठ्या प्रमाणात आवाज येवु लागल्याने पतसस्थेच्या आजूबाजूचे लोक जागे झाले व पतसंस्थेजवळ आले तसेच सायरन सुरू झाल्याचा संदेश बँक मॅनेजर व संचालक यांच्या मोबाईलवर सिक्युरिटी सिस्टीमने कॉल गेल्याने ते तात्काळ पतसंस्थेजवळ आले असता त्यांना पाहुन चोरट्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला व पतसंस्थेत आत घुसून चोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला आहे.
पोलीस स्टेशनला सदर मीटिंगसाठी योगेश रावसाहेब दोडके (साई अर्बन मल्टीस्टेट शेवगाव) ,ऋषिकेश चिंधे (उत्कर्ष अर्बन को.ऑफ सोसायटी शेवगाव),गणेश बडधे (व्य़कटेश मल्टीस्टेट को.ऑफ सोसायटी शेवगाव),पवनकुमार साह(स्टेट बॅक ऑ इंडीया शेवगाव ),गजानन शेवाळे (संत नागेबाबा पतसंस्था शेवगाव),प्रवीण थोरात (आय.डी.बी.आय बॅक शेवगाव),सतीश शिरोळे(कॅनरा बॅक शेवगाव),काकासाहेब हिंगे(श्री.साईराम अर्बन मल्टीस्टेट शेवगाव),कीरण पॉल (एच.डी.एफ.सी बॅक शेवगाव),भाऊसाहेब पाचरणे(साईधन अर्बन मल्टीस्टेट निधी शेवगाव) असे मीटिंगसाठी हजर होते.तसेच शेवगाव पोलीस स्टेशन चे स पो नि विश्वास पावरा व गोपनीय शाखेचे बाप्पासाहेब धाकतोडे यांच्यासह पोलीस कर्मचारी हजार होते.

हे पण वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे पण वाचा
Close
Back to top button