शेकटे ग्रामपंचायत कडून जि प प्रा शाळा शेकटे यांना 2 स्मार्ट एलईडी टीव्ही भेट
वार्ताहर /संपादक
अशोक आव्हाड
शेकटे ग्रामपंचायत कडून जि प प्रा शाळा शेकटे यांना 2 स्मार्ट एलईडी टीव्ही भेट
पाथर्डी तालुक्यातील शेकटे येथील प्राथमिक शाळेमध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साह पार पडला तसेच यावेळी शेकटे येथील ग्रामपंचायत कडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेकटे या शाळेमधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीचे शिक्षण घेता यावे व त्यासाठी एलईडी टीव्ही याची गरज भासत होती याचा विचार करून शेकटे ग्रामपंचायतीने 26 जानेवारी 74 व्या प्रजासत्ताक दिन या दिवशी 2 एलईडी स्मार्ट टीव्ही शाळेला भेट देण्यात आले यावेळी या एलईडी स्मार्ट टीव्ही भेट देताना सरपंच मल्हारी घुले, उपसरपंच डॉ. अशोक घुले, ग्रामसेवक सुभाष दहिफळे, सेवा सोसायटी सदस्य संपत घुले, रामनाथ घुले, मुख्याध्यापक अशोक आंधळे, प्राथमिक शिक्षिका शोभा आव्हाड, वैशाली खेडकर, ज्योती उनडेक, स्वप्नाली घोडके, अंगणवाडी सेविका सविता घुले आदी मान्यवर व ग्रामस्थ व महिलावर्ग व विद्यार्थी यावेळी या कार्यक्रमास उपस्थित होते