मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
शेवगाव प्रतिनिधी
संतोष चिंतामणी
मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
शेवगाव – शेवगाव येथील मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळेत भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिनाचा झेंडावंदन शेवगाव पंचायत समितीचे मा.सभापती अरुण लांडे यांच्या शुभहस्ते व मौलाना आझाद शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष शहानवाज खान संस्थेचे सचिव जमीर पठाण यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुकाअध्यक्ष प्यारेलालभाई शेख,सामाजिक कार्यकर्ते तुफेलभाई मुलाणी,महम्मदसहाब शेख,अहमदभाई मणियार,बाबामामू पठाण,इम्रानभाई शेख,अक्रमभाई शेख,अबू जहागीरदार,मोहसीनभाई शेख,मझरभाई खान,इरफानभाई शेख,हुसेनभाई पठाण, आरेफभाई पठाण,पठाण चष्मेवाले,आसिफभाई बेग,बाबाभाई शेख,ताहेरभाई मणियार,मौलाना सोहेल खान,अमन इनामदार,कलीमभाई शेख,सलीमभाई शेख, आलमभाई शेख, आलमभाई राईन,रुस्तुमभाई पठाण,अन्नूभाई शेख आदी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते तुफेलभाई मुलाणी,अक्रमभाई शेख,अबू जहागीरदार यांच्या तर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.या प्रसंगी शाळेतील मुलांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले व ईतर महापुरुषांचे हुबेहूब पोशाख घालून भाषणे केली कार्यक्रम यशस्वितेसाठी विद्यालयाच्या शिक्षिका हदिया बागवान मॅडम,सना शेख मॅडम, फैमीदा शेख मॅडम, आस्मा पठाण मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आस्मा पठाण मॅडम यांनी केले तर उपस्थितांचे आभार संस्थेचे सचिव जमीर पठाण यांनी मानले