इतर

प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर यांची भगवानगड परिसर प्रेस क्लब साठी ५१ हजार रुपयांची मदत

वार्ताहर/संपादक अशोक आव्हाड

प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर यांची भगवानगड परिसर प्रेस क्लब साठी ५१ हजार रुपयांची मदत

खरवंडी कासार: पाथर्डी तालुक्यातील भगवानगड परिसर प्रेस क्लब या पत्रकार संघाकडून आयोजित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनानिमित्त लोकनेते गोपीनाथ मुंडे जीवन गौरव भगवानगड परिसर भूषण आणि बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी औरंगाबाद येथे कार्यरत असणारे प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना ग्रामीण भागातील पत्रकारिता आजही समाजाभमुख काम करत असून कुठलाही स्वार्थ न ठेवता समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत असते तसेच भगवानगड परिसर प्रेस क्लब या सामाजिक पत्रकार संघटनेकडून समाजातील वंचित पीडित दुर्बल ऊसतोड मजूर कामगारांच्या साठी विविध सामाजिक उपक्रम राबवल्याने कौतुक केले यापुढेही भगवानगड परिसर प्रेस क्लब समाजातील तळागाळातील घटकांसाठी कार्य करत राहील संत भगवानबाबा लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अपेक्षित असलेले समाजकार्य भगवानगड परिसर प्रेस क्लब कडून अपेक्षित असल्याचे प्रतिपादन प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर यांनी व्यक्त केले तसेच भगवानगड परिसर प्रेस क्लब या पत्रकार संघासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांविषयी सद्भावना ठेवून 51 हजार रुपयांची आर्थिक मदत केली यावेळी भगवानगड परिसर प्रेस करायचे अध्यक्ष दादासाहेब खेडकर यांनी प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर यांचे आभार व्यक्त करत यापुढेही भगवानगड परिसर प्रेस क्लब समाजाचा आरसा बनवून पाथर्डी शेवगाव मतदार संघातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून पाथर्डी शेवगाव मतदार संघातील लोकप्रतिनिधी यांच्याकडून विकास काम करण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचा आवाज बनण्याचे कार्य करू असे सांगितले यावेळी भगवानगड परिसर प्रेस क्लबचे उपाध्यक्ष अशोक आव्हाड सचिव विजय शिवगजे कोषाध्यक्ष रमेश देवा जोशी सहसचिव किरण दादा शिरसाठ कार्याध्यक्ष गणेश बोरुडे संपर्कप्रमुख जनार्दन बोडखे प्रसिद्धीप्रमुख भीमराज सुपेकर सदस्य सोमराज बडे शौकत शेख गोरक्ष खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हे पण वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button